Apurva Kulkarni
रितेश जेनेलिया यांची जोडी सर्वांना आवडते. परंतु तुम्हाला त्याचं प्रेम कसं फुललं हे माहिती आहे का?
तुझे मेरी कसम चित्रपटामध्ये दोघांची पहिली भेट झाली. सुरुवातील जेनेलियाला रितेश बिघडलेला मुलगा वाटला होता.
परंतु चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान जेनेलियाला रितेशचा स्वभाव लक्षात आला. मुख्यमंत्र्याचा मुलगा असूनही तो किती साधा-सरळ आहे.
चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. दोघे एकत्र भेटत होते, फिरत होते.
जेव्हा जेनेलिया दिसायची नाही. तेव्हा रितेश जेनेलियाला मिस करायचा. त्याला एका रात्रीच जेनेलियावर प्रेम झालं.
त्यानंतर दोघांना एकमेकांच्या प्रेमाबद्दल जाणीव झाली. आणि 2012 मध्ये त्यांनी लग्न केलं.
रितेश आणि जेनेलिया कधीच एकमेकांना भांडत नाही. दोघेही एकमेकांना समजून घेतात.