सकाळ डिजिटल टीम
रितिका सजदेह ही व्यावसायिक स्पोर्ट्स मॅनेजर असून ती अनेक खेळाडूंसाठी व्यवस्थापन करत होती.
तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी ‘Cornerstone Sport & Entertainment’ मध्ये केली.
पेप्सी, अॅडिडास, ऑडी आणि टिसॉटसारख्या मोठ्या ब्रँडसाठी ती व्यवस्थापन करत होती.
संघ व्यवस्ठापक म्हणून काम करत असताना तिची क्रिकेटपटू रोहित शर्मासोबत मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
रितिकाने 13 डिसेंबर 2015 रोजी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मासोबत लग्न केले.
ती प्रत्येक सामन्यात रोहितला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असते आणि क्रिकेटची मोठी चाहती आहे.