सकाळ डिजिटल टीम
भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
नुकताच त्याचा कोरिओग्राफर धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाला.
घटस्फोटाआधी तो एका मिस्ट्री गर्लसोबत चर्चेत आला होता.
आरजे माहवश या मुलीसोबत चहल ख्रिसमस पार्टी करताना दिसला होता.
त्यानंतर काल भारतविरूद्ध न्यूझीलंड फायनलदरम्यान याच मुलीसोबत चहल दुबईमध्ये सामाना पाहाताना दिसला.
त्यामुळे सोशल मीडियावर दोघांमधील रिलेशनशिपच्या चर्चांनी वेग घेतला आहे.
पण डिसेंबरमध्ये ख्रिसमस पार्टीदरम्यान चर्चेत आलेल्या आरजे महावशने जावेवारीमध्ये चहलसोबतच्या नात्याबाबत खुलासा केला होता.
यावेळी तिने इंस्टाग्राम स्टोरी टाकत युझवेंद्रला डेट करत नसल्याचे सांगितले होते.