सकाळ डिजिटल टीम
मागच्या ३ महिन्यांपसून भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलच्या घटस्फोटाची चर्चा सुरू होती.
पण मागच्या महिन्यात चहलचा कोरिओग्राफर धनश्री वर्मासोबत अखेर त्याचा घटस्फोट झालाच.
त्याच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच चहल ख्रिसमस पार्टीमध्ये एका मिस्ट्री गर्ल सोबत पाहायला मिळाला होता.
पार्टीमध्ये चहलच्या बाजूला बसलेल्या त्या मुलीचे नाव आरजे माहवश असे आहे.
आज भारतविरूद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात चहल पुन्हा या मुलीसोबत दिसला आहे.
त्यामुळे सोशल मीडियावर आता चहलच्या रिलेशनशीपची चर्चा सुरू झाली आहे.
आरजे माहवश दिल्लीतील असून तिने एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटरमधून आपले पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.
धनश्री प्रमाणेच महावश देखील सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असते. तिचे इंस्टाग्रामवर १.४ मिलिअन फोलोवर्स आहेत.