संतोष कानडे
रॉक हायरेक्स नावाचा प्राणी नेहमी एकाच ठिकाणी लघवी आणि विष्ठा करतो. विशेष म्हणजे या प्राण्यांचा संपूर्ण गट त्याच ठिकाणी लघुशंका करतो.
या प्रण्याची लघवी आणि विष्ठा मिळून 'मिडन' तयार होतो. हा साठा हळूहळू घट्ट आणि चिकट बनतो.
यालाच “हायरॅक्सियम” म्हणतात. हा साठा शेकडो ते हजारो वर्ष टिकतो. अत्तर उद्योगात याचा वापर 'मस्क' गंधासाठी केला जातो.
वैज्ञानिक याचा वापर जुने हवामान समजण्यासाठी करतात. कारण लघवीमध्ये विशिष्ट रासायनिक घटक असतात.
रॉक हायरेक्स या प्राण्याच्या लघवीला खूप तीव्र आणि वेगळा वास येतो.
हा वास क्षेत्र निश्चित करण्यासाठी वापरला जातो. हायरेक्स एकमेकांशी ओळख आणि संवादासाठी याचा उपयोग करतात.
या लघवीमुळेच गटातील सदस्यांना सुरक्षितता मिळते. काही आफ्रिकन भागात हा साठा पारंपरिक औषधात वापरतात.
म्हणून हायरेक्सची लघवी वैज्ञानिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. रंजक म्हणजे हा पदार्थ हजारो वर्षे टिकतो.