पोस्टिंग नसताना तुकाराम मुंढेंना किती पगार मिळतो?

संतोष कानडे

आयएएस

विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशन संपल्यानंतर ३१ मार्च रोजी राज्य सरकारने दहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते.

दिव्यांग कल्याण विभाग

दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची बदली आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवपदी करण्यात आली होती.

विनिता वैद सिंघल

याच पदावर कार्यरत असलेल्या विनिता वैद सिंघल यांची रवानगी मृद व जलसंधारण विभागात करण्यात आली होती, मात्र त्यांची बदली रद्द झाली आणि मुंडे नियुक्तीच्या प्रतीक्षेत राहिले.

तुकाराम मुंढे

२३ दिवस झाले तरी तुकाराम मुंढेंना नियुक्ती मिळालेली नाही. या काळात त्यांना किती पगार मिळतो, अशी सोशल मीडियात चर्चा आहे.

ऑन ड्यूटी

मात्र आयएएस अधिकाऱ्यांना ऑन ड्यूटी समजून त्यांचा पूर्ण पगार काढला जातो. अधिकाऱ्यांचा पगार 7th Pay Commission नुसार ठरतो.

बेसिक पगार

आयएएस अधिकाऱ्यांना बेसिक पगार साधारण ₹1.18 लाख ते ₹1.44 लाख दरम्यान असतो. यावर महागाई भत्ता (DA) अतिरिक्त मिळतो.

महागाई भत्ता

महागाई भत्ता ५५ टक्क्यांच्याही पुढे गेलेला आहे. अधिकाऱ्यांना घरभाडे भत्ता (HRA) किंवा सरकारी निवास मिळतो.

सुविधा

अधिकृत वाहन, ड्रायव्हर आणि इतर सुविधा दिल्या जातात. पोस्टिंग नसली तरी ते सेवेत असल्यामुळे आयएएस अधिकाऱ्यांना पगार मिळतो.

काही भत्ते परिस्थितीनुसार कमी-जास्त होऊ शकतात. मुंढेंचा मासिक पगार साधारण 1.7 लाख ते ₹2.2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

या डाळीला नॉन व्हेज का म्हणतात?

<strong>येथे क्लिक करा</strong>