Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेत २७ एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात सामना झाला.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सकडून सलामीला रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा उतरले होते.
पहिले दोन पूर्ण षटके रिकल्टनने खेळून काढल्यानंतर तिसऱ्या षटकात रोहित स्ट्राईकवर आला. त्याने त्याच्या पहिल्या दोन चेंडूंवर खणखणीत षटकार मारला.
आयपीएलमध्ये असं पहिल्यांदाच झालं की रोहितने त्याच्या खेळीत पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार मारले.
तसेच आयपीएलमध्ये पहिल्या दोन चेंडूंवर षटकार मारणारा तो हरभजन सिंग नंतरचा मुंबई इंडियन्सचा दुसराच खेळाडू ठरला. हरभजनने २०१२ साली राजस्थान रॉयल्सविरुद्ध असा कारनामा केला होता.
याशिवाय डावाच्या सुरुवातीच्या पहिल्या दोन चेंडूंवर षटकार खेचणारा रोहित हा तिसरा सलामीवीर ठरला. यापूर्वी विराट कोहली (वि. राजस्थान, बंगळुरू, २०१९)आणि यशस्वी जैस्वाल (वि. कोलकाता, २०२३) यांनी हा पराक्रम केला होता.
पण रोहित या षटकारांनंतर तिसऱ्याच षटकात ५ चेंडूत १२ धावांवर बाद झाला. त्याला मयंक यादवने बाद केले.