Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला २५ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादने ५ विकेट्सने पराभूत केले.
चेन्नईला यंदाच्या हंगामात सलग चौथ्यांदा घरच्या मैदानात चेपॉकमध्ये पराभवाचा धक्का बसला.
चेन्नईला या हंगामात सुरुवातीपासूनच मोठे धक्के बसले आहेत. त्यांचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर गेला, त्यातच संघाची कामगिरीही फारशी चांगली झाली नाही.
पण असे असले तरी चेन्नईचा दिग्गज एमएस धोनीची लोकप्रियता मात्र कमी झालेली नाही.
चेन्नईच्या लाडक्या थालाला पाहायला स्टेडियममध्ये तुफान गर्दी पाहायला मिळते. अशातच २५ एप्रिलला झालेल्या सामन्यात एका खास व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधले.
ही व्यक्ती म्हणजे अभिनेता अजित कुमार, जो दाक्षिणात्य सिनेसृष्टीत थाला म्हणून प्रसिद्ध आहे. तो त्याच्या कुटुंबासह स्टेडियममध्ये उपस्थित होता.
त्यामुळे एक थाला दुसऱ्या थालाला पाहायला आल्याने त्यांची जोरदार चर्चाही झाली.