Pranali Kodre
रोहित शर्माने नुकतेच मे महिन्यात ३८ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
कसोटीमधून निवृत्तीनंतर रोहित आता केवळ वनडे खेळताना दिसणार आहे.
दरम्यान, आयपीएल २०२५ नंतर रोहितने कुटुंबासोबत विश्रांतीसाठी युरोपमध्ये फिरायला गेला आहे.
रोहित त्याच्या कुटुंबासोबत सध्या युरोपमधील सुंदर स्थळांना भेट देत आहेत.
रोहितने आपल्या सहलीचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या सहलीदरम्यान रोहित त्याची पत्नी आणि मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवत आहे.
रोहितने आपल्या मुलासोबत देखील एक खास फोटो शेअर केला असून चाहत्यांकडून लाखो लाईक्स त्या फोटोला आले आहेत.
भारताचा पुढील वनडे क्रिकेट दौरा ऑगस्ट महिन्यात बांगलादेशचा असणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा खेळताना दिसू शकतो.