Pranali Kodre
वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले.
विजेतेपद पटकावण्यासोबतच इतर पुरस्कारांवरही मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिल्याचे दिसले.
सर्वाधिक धावांसाठी दिला जाणारा ऑरेंज कॅप पुरस्कार मुंबईची अष्टपैलू नतालिया सायव्हर ब्रंट हिला मिळाला.
नॅट सायव्हर-ब्रंटने १० सामन्यांत एकूण ५२३ धावा चोपल्या.
सर्वाधिक विकेट्ससाठी दिला जाणारा पर्पल कॅप पुरस्कार मुंबईची अष्टपैलू एमेलिया केर हिला मिळाला.
एमेलिया केर हिने या हंगामात एकूण १८ विकेट्स घेतल्या.
वूमन्स प्रीमियर लीग २०२५ मधील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही नॅट सायव्हर-ब्रंटला गौरविण्यात आले. तिने ५२३ धावांसोबतच १२ विकेट्सही घेतल्या.
वूमन्स प्रीमियर लीग २०२५ मधील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू म्हणून मुंबईच्या अमनज्योत कौरची निवड करण्यात आली.