सचिन, रोहित की विराट... वयाची तिशी ओलांडल्यानंतर कोणी ठोकली सर्वाधिक शतके?

अनिरुद्ध संकपाळ

वयाची तिशी पार केल्यानंतर अनेक खेळाडू कारकिर्दीच्या उतरंडीला लागतात.

मात्र असेही काही आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत ज्यांचा खरा फॉर्म हा तिशी पार केल्यानंतरच दिसतो.

भारताचे देखील असे खेळाडू आहेत ज्यांनी तिशी पार केल्यानंतर चांगली कामगिरी केली आहे.

तिशी पार केल्यानंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा 35 शतकांसह अव्वल स्थानावर आहे.

रोहित शर्माने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सचिनने देखील तिशी पार केल्यावर 35 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली होती.

या यादीत राहुल द्रविडचा नंबर सचिन तेंडुलकरनंतर लागतो. त्याने वयाची तीस वर्ष पूर्ण केल्यावर 26 आंतरराष्ट्रीय शतकी खेळी केल्या.

विराट कोहलीने तिशीनंतर 18 शतके ठोकली आहेत. तो या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

पाचव्या स्थानावर दिग्गज सुनिल गावसकर असून त्यांनी तिशी ओलांडल्यावर 16 वेळा धावांची शंभरी पार केली.

'या' गोलंदाजांना षटकार मारणं महाकठीण काम; हंगामात दाखवला फार चिंगुसपणा