गेल्या दोन दशकात पद्मश्री पुरस्कार मिळवणारे क्रिकेटपटू

Pranali Kodre

पद्म पुरस्कार

नुकतेच २६ जानेवारी २०२६ रोजी पद्म पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली. पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत.

Padma Shri Winners Cricketers

|

Sakal

रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर

यंदा २०२६ मध्ये भारताचा टी२० वर्ल्ड कप आणि चॅम्पिटन्स ट्रॉफी विजेता कर्णधार रोहित शर्मा आणि महिला वनडे वर्ल्ड कप विजेती कर्णधार हरमनप्रीत कौर या क्रिकेटपटूंना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.

Harmanpreet Kaur - Rohit Sharma

|

Sakal

२००४ पासून पद्मश्री पुरस्कार मिळवणारे क्रिकेटपटू

त्यामुळे आता पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. आपण २००४ पासून पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊ.

Padma Shri Winners Cricketers

|

Sakal

२००४

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या दोघांना २००४ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.

Rahul Dravid - Sourav Ganguly

|

Sakal

२००५

भारताचा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा गोलंदाज अनिल कुंबळे याला २००५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Anil Kumble

|

Sakal

२००९

भारताचा यशस्वी कर्णधार एमएस धोनी आणि दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग यांना २००९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

MS Dhoni - Harbhajan Singh

|

Sakal

२०१०

भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याला २०१० मध्ये पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता.

Virender Sehwag

|

Sakal

२०११

भारताचा दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणला २०११ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

VVS Laxman

|

Sakal

२०१२

भारताची दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामी हिला २०१२ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.

Jhulan Goswami

|

Sakal

२०१४

भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याला २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Yuvraj Singh

|

Sakal

२०१५

भारताची माजी कर्णधार मिताली राज हिला २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

Mithali Raj

|

Sakal

२०१७

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीला २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.

Virat Kohli

|

Sakal

२०१९

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याला २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.

Gautam Gambhir

|

Sakal

२०२०

भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान याला २०२० मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.

Zaheer Khan

|

Sakal

२०२३

माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक गुरुचरण सिंग यांना २०२३ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.

Gurcharan Singh

|

Sakal

२०२५

भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विनन याला २०२५ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.

R Ashwin

|

Sakal

भारतीय संघाची T20I मध्ये मायदेशात 'स्पेशल सेंच्युरी'; ठरला केवळ तिसराच संघ

Team India

|

Sakal

येथे क्लिक करा