Swadesh Ghanekar
“सर्वांना माझा नमस्कार, मी हे सांगू इच्छितो की, मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे,''असे त्याने लिहिले.
रोहित शर्माने ६७ कसोटी सामन्यांत ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या आहेत. त्यात १२ शतकं व १८ अर्धशतकांचा समावेश आहे.
कसोटीत त्याने ४७३ चौकार व ८८ षटकार खेचले आहेत आणि ६८ झेल त्याच्या नावावर आहेत. २१२ धावा ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.
रोहित शर्माच्या नावावार एका कसोटीत सर्वाधिक १३ षटकार खेचण्याचा विक्रम आहे.
कसोटी क्रिकेटच्या दोन्ही डावांत शतक झळकावणारा तो सहावा फलंदाज आहे. त्याने २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १७६ व १२७ धावांची खेळी केली होती.
रोहित शर्मा व महेंद्रसिंग धोनी यांच्या निवृत्ती जाहीर करण्याची वेळ एकच आहे.
महेंद्रसिंग धोनी व रोहित शर्मा यांनी भारतातील शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला होता.
महेंद्रसिंग धोनी व रोहित शर्मा यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्दितील शेवटची कसोटी ही मेलबर्नवर खेळली गेली.