रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीने पत्नी रितिकाचाही हार्टब्रेक; पाहा काय दिली प्रतिक्रिया

Pranali Kodre

रोहित शर्मा

भारताचा स्टार क्रिकेटपटू कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Rohit Sharma Test Retirement | Sakal

कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

भारताला इंग्लंड दौऱ्यात २० जून २०२५ पासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी रोहितने कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली.

Rohit Sharma Test Retirement | Sakal

निवृत्तीची घोषणा

रोहितने कसोटीतून निवृत्तीची घोषणा करताना इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या कसोटी कॅपचा फोटो शेअर केला आहे.

Rohit Sharma Test Retirement | Instagram

कॅप्शन

रोहितने या पोस्टमध्ये लिहिले, 'मी कसोटीतून निवृत्त होत आहे. कसोटीत माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, हा मोठा सन्मान आहे. सर्वांना इतक्या वर्षांच्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद. मी भारताचे वनडेमध्ये प्रतिनिधित्व करणे कायम करणार आहे.'

Rohit Sharma Test Retirement | Sakal

पत्नी रितिकाची प्रतिक्रिया

रोहितच्या कसोटी निवृत्तीवर त्याची पत्नी रितिकाचीही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Rohit Sharma wife Ritika Sajdeh | Sakal

हार्टब्रेक

तिने रोहितने पोस्ट केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीचा फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला शेअर करत हार्टब्रेकचे इमोजी शेअर केले आहेत.

Ritika Reaction on Rohit Sharma Test Retirement | Instagram

रोहितची कसोटीतील कामगिरी

रोहित शर्माने ६७ कसोटी सामन्यांमध्ये १२ शतके आणि १८ अर्धशतकांसह ४३०१ धावा केल्या. त्याने २४ कसोटींमध्ये भारताचे नेतृत्वही केले.

Rohit Sharma Test Retirement | Sakal

सचिनने सुचवलं नसतं, तर मुंबई 'इंडियन्स' म्हणून नाही, तर 'या' नावानं ओळखले गेले असते

Mumbai Indians | Sakal
येथे क्लिक करा