वानखेडेवर रोहितच्या नावाचं स्टँड; हिटमॅन म्हणतोय, 'मी कधीच...'

Pranali Kodre

मोठे यश

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याच्या कारकि‍र्दीत मोठे यश मिळवले आहे.

Rohit Sharma | Sakal

कर्णधार

त्याच्या नेतृत्वात भारताने २०२४ टी२० वर्ल्ड कप आणि २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तसेच मुंबई इंडियन्सने ५ आयपीएल ट्रॉफी देखील मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वात जिंकली.

Rohit Sharma | Sakal

स्टँड

यानंतर आता रोहितच्या नावाने वानखेडे स्टेडियममध्ये स्टँड नाव देण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे.

Rohit Sharma | Sakal

एमसीएचा निर्णय

१५ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

Rohit Sharma | Sakal

प्रतिक्रिया

याबाबत एका कार्यक्रमात बोलताना रोहितने प्रतिक्रिया दिली असून अशा सन्मानाची कल्पना केली नव्हती असं त्याने म्हटले आहे.

Rohit Sharma | Sakal

रोहित म्हणाला...

रोहितने म्हटले, 'जेव्हा तुम्हाला असा सन्मान मिळतो की तुमचं नाव स्टँडला दिलं जातं, ही अशी गोष्ट आहे ज्याची मी कल्पनाच करू शकत नव्हतो.'

Rohit Sharma | Sakal

वानखेडेवरील स्टँड

वानखेडे स्टेडियमवर यापूर्वीच पॉली उम्रीगर, सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांच्या नावाचे स्टँड्स आहेत.

Sachin Tendulkar Stand | Sakal

बचपन का प्यार! भूवी भाडेकरूच्यांच मुलीच्या प्रेमात पडला अन्...

Bhuvneshwar Kumar Nupur | Instagram
येथे क्लिक करा