Swadesh Ghanekar
रोहित शर्मा सध्या भारतीय संघासह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईमध्ये आहे,
भारतीय संघाने सलग दोन सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
भारतीय संघाचा साखळी गटातील शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध रविवारी होणार आहे.
रोहित शर्मा पण सध्या लोअर परळ येथील घर भाड्याने दिल्याच्या वृत्तामुळे चर्चेत आला आहे.
नोंदणी महानिरीक्षक (IGR) च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांवरून ही बातमी मिळाली आहे.
हे अपार्टमेंट लोढा मार्क्विस - द पार्क येथे आहे. हा ७ एकर जागेत पसरलेला रेडी-टू-मूव्ह गृहनिर्माण प्रकल्प आहे.
स्क्वेअर यार्ड्सच्या मते, या व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी १६,३०० रुपये आहे आणि नोंदणी शुल्क १,००० रुपये आहे.
रोहित लोअर परळ येथील त्याची मालमत्ता २.६० लाख रुपयांच्या मासिक भाड्याने दिली आहे.
रोहित आणि त्याचे वडील गुरुनाथ शर्मा यांनी मार्च २०१३ मध्ये ५.४६ कोटी रुपयांना खरेदी केले होते
रोहितने २०१३ मध्ये या प्रकल्पात २ अपार्टमेंट खरेदी केले होते. दुसऱ्या अपार्टमेंटची किंमत ५.७० कोटी रुपये होती.