Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड संघात वनडे मालिकेला आज (६ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे.
या मालिकेतील पहिला सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला.
पण या सामन्यासाठी भारताचा सध्याचा सर्वात अनुभवी खेळाडू विराट कोहलीला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आलेली नाही.
यामागील कारण भारताचा कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर भारताचा कर्णधार रोहितने सांगितले की भारतीय संघाला प्रथम गोलंदाजीच करायची होती.
याशिवाय त्याने सांगितले की या सामन्यातून यशस्वी जैस्वाल आणि हर्षित राणा यांचे वनडेत पदार्पण होत आहे.
मात्र विराट कोहली या सामन्याला मुकणार आहे, कारण काल रात्री त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.
त्यामुळे दुखापतीमुळे विराट या सामन्यातून बाहेर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.