Pranali Kodre
भारत आणि इंग्लंड संघात ६ फेब्रुवारीपासून वनडे मालिका खेळली जाणार आहे.
त्यानंतर १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबई येथे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
त्यामुळे पुढील एक महिना तरी भारतीय संघ वनडे क्रिकेटमध्ये व्यस्त राहणार आहे.
अशात त्याआधी भारतीय संघाचे नव्या वनडे जर्सीत फोटोशूट झाले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेपासून भारतीय संघ नवी जर्सी परिधान करणार आहे.
नवी जर्सीही नेहमीप्रमाणे निळ्या रंग छटेत आहे.
त्याचबरोबर या नव्या जर्सीच्या खांद्यावर भारताच्या राष्ट्रध्वजातील तिन्ही रंग आहेत.
तसेच जर्सीच्या पुढच्या बाजूला भारत देशाचे नाव असून बीसीसीआयचा लोगोही आहे.
तसेच किट स्पॉन्सर्स आदीदासचा आणि संघाचे स्पॉन्सर्स ड्रिम इलेव्हनचा लोगोही जर्सीवर आहे.
मागच्या बाजूला खेळाडूंचे नाव आणि जर्सी क्रमांक आहे.
बीसीसीआयने या नव्या जर्सीतील खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.