Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा रोहित शर्माच्या नेतृत्वात जिंकली.
ही स्पर्धा जिंकल्यानंतर आता काही भारतीय क्रिकेटपटू दुबईहून घरी परतले आहेत, तर काही क्रिकेटपटू थेट त्यांच्या आयपीएल संघात दाखल झाले आहेत.
कर्णधार रोहित शर्मा देखील त्याच्या घरी परतला आहे.
रोहितने आयपीएल २०२५ पूर्वी थोडा वेळ कुटुंबाला देण्यास प्राधान्य दिलं आहे.
त्याने नुकताच एक फोटो शेअर केला असून त्याच्या नवज्यात मुलाला त्याने कडेवर घेतल्याचे दिसत आहे. तसेच त्याच्या बाजूला त्याची लेक समायराही खेळत आहे.
रोहितने त्याचा मुलासोबतचा फोटो पहिल्यांदाच शेअर केला आहे.
रोहित आणि त्याची पत्नी रितिका यांना १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली असून त्याचं नाव त्यांनी आहान ठेवलं आहे. हे त्यांचे दुसरे अपत्य आहे.