रोहित शर्माने २०२५ मध्ये केले 'हे' ७ मोठे विक्रम

Pranali Kodre

रोहित शर्मा

रोहित शर्मासाठी २०२५ वर्ष खास ठरले. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्याने याच वर्षी कसोटीतून निवृत्ती घेतली. याशिवाय वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकही मिळवला.

Rohit Sharma

|

Sakal

रोहित शर्माचे २०२५ मधील विक्रम

रोहितने या वर्षी अनेक विक्रमांना गवसणी घातली, यातील ७ खास विक्रमांवर नजर टाकू.

Rohit Sharma

|

Sakal

दुसरं आयसीसी विजेतेपद

भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, त्यामुळे वनडे आणि टी२० प्रकारात आयसीसी ट्रॉफी जिंकणारा तो एमएस धोनीनंतरचा दुसरा भारतीय कर्णधार ठरला. त्याने गेल्यावर्षी कर्णधार म्हणून टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धे जिंकली होती.

Rohit Sharma

|

Sakal

५० शतके

रोहितने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतके पूर्ण केली. तो ५० आंतरराष्ट्रीय शतके करणारा भारताचा सचिन तेंडुलकर (१०० शतके) आणि विराट कोहलीनंतरचा (८४ शतके) तिसरा खेळाडू ठरला.

Rohit Sharma

|

Sakal

सर्वाधिक वनडे षटकार

रोहितने या वर्षी सर्वाधिक वनडे षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवला. त्याचे २७९ सामन्यांत ३५५ षटकार झाले असून त्याने शाहिद आफ्रिदीला (३५१ षटकार) मागे टाकले.

Rohit Sharma

|

Sakal

सलामीला सर्वाधिक धावा

२०२५ मध्ये रोहितने सलामीला खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करताना विरेंद्र सेहवागच्या १५७५८ धावांच्या विक्रमाला मागे टाकले. रोहितने सलामीला खेळताना ३५५ सामन्यांत १५९३३ धावा केल्या.

Rohit Sharma

|

Sakal

सचिनशी बरोबरी

रोहितने २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सलामीला खेळताना सर्वाधिक शतके करण्याच्या सचिन तेंडुलकरच्या ४५ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

Rohit Sharma

|

Sakal

सलामीवीर म्हणून सर्वात जलद ९००० धावा

रोहितने वनडेत सलामीवीर म्हणून सर्वात जलद ९००० धावांचा टप्पा २०२५ मध्येच पूर्ण केला. त्याने १८१ डावात ९००० धावांचा टप्पा गाठताना सचिन तेंडुलकरचा (१९७ डाव) विक्रम मोडला.

Rohit Sharma

|

Sakal

वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांक

रोहित २०२५ मध्ये पहिल्यांदाच वनडे क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आला. तो अव्वल क्रमांक मिळवणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. त्याने ३८ वर्षे १८२ दिवस वय असताना हा विक्रम केला.

Rohit Sharma

|

Sakal

विराट कोहलीने २०२५ मध्ये केले 'हे' ७ मोठे विक्रम

Virat Kohli

|

Sakal

येथे क्लिक करा