विराट कोहलीने २०२५ मध्ये केले 'हे' ७ मोठे विक्रम

Pranali Kodre

विराट कोहली

विराट कोहलीसाठी २०२५ हे वर्ष विशेष राहिले. त्याने या वर्षाच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तसेच कसोटीतून निवृत्तीचा निर्णयही घेतला. याशिवाय वनडेमध्ये त्याने अनेक मैदानं गाजवली.

Virat Kohli

|

Sakal

विराट कोहलीचे २०२५ मधील विक्रम

विराटने २०२५ मध्ये काही खास विक्रमही केले. यातील ७ विक्रमांवर नजर टाकू.

Virat Kohli

|

Sakal

वनडेत सर्वात जलद १४ हजार धावा

विराट कोहलीने २०२५ वर्षात वनडेमध्ये १४ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने केवळ २८७ डावात १४ हजार धावा केल्या. त्यामुळे त्याने सर्वात कमी डावात १४ हजार धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा (३५० डाव) विक्रम मोडला.

Virat Kohli

|

Sakal

एकाच प्रकारात सर्वाधिक शतके

विराटने २०२५ मध्ये वनडेत ३ शतके केली. त्यामुळे त्याची ५३ वनडे शतके झाली असून एकाच क्रिकेट प्रकारात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम त्याने केला. त्याने सचिन तेंडुलकरच्या कसोटीतील ५१ शतकांच्या विक्रमाला मागे टाकले.

Virat Kohli

|

Sakal

आयसीसीच्या बाद फेरीत १००० धावा

विराटने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळताना आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत १००० धावा करण्याचा विक्रम केला. तो आयीसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत १००० धावा करणारा पहिला खेळाडू ठरला.

Virat Kohli

|

Sakal

वनडेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा

विराटने या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कुमार संगकाराला (१४२३४) मागे टाकत दुसला क्रमांक मिळवला. विराटने वनडेत ३०८ सामन्यात १४५५७ धावा केल्या आहेत.

Virat Kohli

|

Sakal

सर्वाधिक झेल घेणारा भारतीय क्षेत्ररक्षक

विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय देखील ठरला. त्याने ३४२ झेल घेतले. त्याच्यापुढे सध्या केवळ माहेला जयवर्धने (४४० झेल), रिकी पाँटिंग (३६४ झेल), रॉस टेलर (३५४ झेल) आणि स्टीव्ह स्मिथ (३४३ झेल) आहेत.

Virat Kohli

|

Sakal

वनडेत सर्वाधिक झेल

वनडेमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीतही विराट यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्याने वनडेत १६७ झेल घेतले आहेत. त्याच्यापुढे या यादीत केवळ माहेला जयवर्धने (२१८ झेल) आहे.

Virat Kohli

|

Sakal

विजयी सामन्यांमध्ये १८ हजार धावा

विराटने विजय मिळवलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १८ हजार धावा पूर्ण करण्याचा टप्पा यावर्षी पूर्ण केला. हा टप्पा पार करणारा तो रिकी पाँटिंगनंतरचा (२०१४० धावा) दुसराच खेळाडू ठरला. विराटने विजयी सामन्यांमध्ये १८३२३ धावा केल्या.

Virat Kohli

|

Sakal

T20I मध्ये एकाच वर्षात सर्वाधिक सिक्स मारणारे भारतीय

Abhishek Sharma - Shubman Gill

|

Sakal

येथे क्लिक करा