Pranali Kodre
कटकला ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या वनडेत भारतीय संघाने इंग्लंडला ४ विकेट्सने पराभूत केले.
भारताच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माने शतक ठोकत महत्त्वाचा वाटा उचलल्याने त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
रोहितने या सामन्यात ९० चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांसह ११९ धावांची शतकी खेळी केली. त्याने या डावात ७ षटकार मारल्याने मोठा विक्रमही केला आहे.
रोहित आता वनडेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ख्रिस गेलला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
रोहितने आता वनडेत २५९ डावात ३३८ षटकार मारले आहेत.
वनडेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी असून त्याने ३६९ डावात ३५१ षटकार मारले आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर रोहित असून तिसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल असून त्याने २९४ डावात ३३१ षटकार मारले आहेत.
या यादीत चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आहे. त्याने ४३३ डावात २७० षटकार मारले आहेत.
पाचव्या क्रमांकावर असलेल्या एमएस धोनीने २९७ डावात २२९ षटकार मारले आहेत.
ही आकडेवारी ९ फेब्रुवारी २०२५ पर्यंतची आहे.