'ओपनर' रोहित शर्मा ठरला सचिन तेंडुलकरला सरस, मोडला मोठा विक्रम

Pranali Kodre

भारताचा विजय

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध ९ फेब्रुवारी रोजी कटकला झालेल्या दुसऱ्या वनडेत ४ विकेट्सने विजय मिळवला.

Rohit Sharma - Shreyas Iyer | Sakal

सामनावीर

भारताच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माने शतक ठोकत मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला या सामन्यातील सामनावीर पुरस्कारही मिळाला.

Rohit Sharma - Shubman Gill | Sakal

रोहितचे शतक

रोहितने ९० चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांसह ११९ धावांची खेळी केली.

Rohit Sharma | Sakal

सलामीवीर

रोहितने या शतकी खेळीसह सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रमही मोडला आहे. रोहित आता भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी सलामीवीर ठरला आहे.

Rohit Sharma | Sakal

सचिनला मागे टाकलं

रोहितने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला खेळताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिनला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवला आहे.

Rohit Sharma | Sakal

रोहितच्या धावा

रोहितने सलामीवीर म्हणून ३६८ डावात १५४०४ धावा केल्या आहेत. ज्यात ४४ शतकांचा समावेश आहे.

Rohit Sharma | Sakal

सचिनच्या धावा

सचिनने सलामीवीर म्हणून ३४२ डावात १५३३५ धावा केल्या आहेत, ज्यात ४५ शतकांचा समावेश आहे.

Sachin Tendulkar | Sakal

पहिला क्रमांक

भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला खेळताना सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर विरेंद्र सेहवाग आहे.

Virender Sehwag | Sakal

सेहवागच्या धावा

सेहवागने ३८८ डावात ३६ शतकांसह १५७५८ धावा सलामीला खेळताना केल्या आहेत.

Virender Sehwag | Sakal

पॅट कमिन्स दुसऱ्यांदा झाला बाबा, पाहा लेकीचा फोटो

Pat Cummins with wife Becky | Instagram
येथे क्लिक करा