Pranali Kodre
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ऍडलेडला २३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुसरा सामना पार पडला, ज्यात ऑस्ट्रेलियाने २ विकेट्सने विजय मिळवला.
Rohit Sharma-Shreyas Iyer
Sakal
पण, असे असले तरी रोहित शर्माने या सामन्यात शानदार खेळ करताना ७३ धावांची खेळी केली.
Rohit Sharma
Sakal
त्यामुळे रोहितच्या आता वनडेत सलामीवीर म्हणून १८८ सामन्यांत ९२१९ धावा झाल्या आहेत.
Rohit Sharma
Sakal
त्यामुळे रोहित आता सौरव गांगुली आणि ऍडम गिलख्रिस्ट यांना मागे टाकून वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या सलामीवीरांमध्ये चौथ्या क्रमांकावर आला आहे.
Rohit Sharma
Sakal
सौरव गांगुली या यादीत आता सहाव्या क्रमांकावर गेला असून त्याने २४२ वनडेत सलामीला खेळताना ९१४६ धावा केल्या आहेत.
Sourav Ganguly
Sakal
गिलख्रिस्ट पाचव्या क्रमांकावर असून त्याने २६० वनडेत सलामीला खेळताना ९२०० धावा केल्या आहेत.
Adam Gilchrist
Sakal
रोहितच्या वर तिसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल असून त्याने २८० वनडेत सलामीला खेळताना १०१७९ धावा केल्या.
Chris Gayle
Sakal
सनथ जयसूर्या या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने ३८८ वनडेत सलामीला खेळताना १२७४० धावा केल्या.
Sanath Jayasuriya
Sakal
सचिन तेंडुलकरने ३४४ वनडेत सलामीला खेळताना सर्वाधिक १५३१० धावा केल्या आहेत.
Sachin Tendulkar
Sakal
Shubman Gill
Sakal