Pranali Kodre
शुभमन गिलने पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यातून भारताच्या वनडे कर्णधारपदाची धुरा हाती घेतली.
India vs Australia
Sakal
त्यामुळे गिल भारतीय वनडे संघाचे सर्वात कमी वयात नेतृत्व करणारा सातव्या क्रमांकाचा खेळाडू ठरला.
Shubman Gill
Sakal
त्याने जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडेत नेतृत्व केले, तेव्हा त्याचे वय २६ वर्षे ४१ दिवस होते.
Shubman Gill
Sakal
या यादीत सहाव्या क्रमांकावर रवी शास्त्री आहेत. त्यांनी जेव्हा २७ जानेवारी १९८७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदा वनडेत नेतृत्व केले होते, तेव्हा त्यांच वय २४ वर्षे २४५ दिवस होते.
Ravi Shastri
Sakal
पाचव्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने २ जुलै २०१३ रोजी श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदा वनडेत नेतृत्व केले, तेव्हा त्याचे वय २४ वर्षे २३९ वर्षे होते.
Virat Kohli
Sakal
चौथ्या क्रमांकावर विरेंद्र सेहवाग आहे, त्याने १६ एप्रिल २००३ रोजी बांगलादेशविरुद्ध पहिल्यांदा वनडेत नेतृत्व केले, तेव्हा त्याचे वय २४ वर्षे १७८ दिवस होते.
Virender Sehwag
Sakal
कपिल देव तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी श्रीलंकेविरुद्ध १२ सप्टेंबर १९८२ रोजी पहिल्यांदा वनडेत नेतृत्व केले, तेव्हा त्यांचे वय २३ वर्षे २४९ दिवस होते.
Kapil Dev
Sakal
दुसऱ्या क्रमांकावर सुरेश रैना असून त्याने २८ मे २०१० रोजी झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्यांदा वनडेत नेतृत्व केले, तेव्हा २३ वर्षे १८२ दिवस वय होते.
Suresh Raina
Sakal
पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याने २८ ऑगस्ट १९९६ रोजी श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदा भारताचे नेतृत्व केले, तेव्हा त्याचे वय २३ वर्षे १२६ दिवस होते.
Sachin Tendulkar
Sakal
Shubman Gill
Sakal