Pranali Kodre
मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे.
मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावलं होतं.
पण आज मुंबई या संघापुढे इंडियन्स नाव लागण्यामागं सचिन तेंडुलकर कारण आहे, हे माहित आहे का?
खरंतर मुंबई इंडियन्सचं नाव सुरुवातीला इंडियन्स असं ठेवलेलंच नव्हतं, तर ते होतं मुंबई रेझर्स.
मुंबई इंडियन्सच्या लोगोमध्येही एक चक्र म्हणजेच रेझर दिसत आहे. या चक्रमागे आणखी एक विचार असाही मांडला जातो की हे सुदर्शन चक्राचे प्रतीक आहे.
पण २००८ मध्ये सचिन तेंडुलकल हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि आयकॉन खेळाडू होता. त्यानेच मुंबई रेझर्स हे नाव बदलण्यास संघमालक अंबानींना सुचवलं.
सचिनने इंडियन्स हे नाव जोडण्यास सांगितलं कारण ते भारतीयांना आपलंस वाटेल. त्याचा हा सल्ला ऐकण्यात आला आणि मुंबई फ्रँचायझीचं नाव झालं 'मुंबई इंडियन्स'