Swadesh Ghanekar
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा कुटुंबियांसोबत क्वालिटी वेळ घालवतोय
रोहित पत्नी रितिका, मुलगी सॅमी आणि मुलगा अहान यांच्यासोबत पिकनिकला गेला आहे.
रोहित शर्मा अँड त्याचे कुटुंबिय मुंबईच्या विमानतळावर दिसले. भारतीय संघाची वन डे मालिका ऑगस्टमध्ये आहे. त्यामुळे रोहितकडे वेळ आहे.
रोहितचा मुलगा अहान याने मुंबई विमानतळावर सर्वांचे लक्ष वेधले. रितिकाने अहानला कडेवर घेतले होते.
अहानचा फोटो तुफान व्हायरल होत असून, चाहते त्याला रोहितची 'कार्बन कॉपी' म्हणत आहेत.
वडिलांप्रमाणेच त्याच्या चेहऱ्यावर हसरा आणि शांतभाव जाणवत होता. काहींनी तर ‘Mini Hitman’ अशीही कमेंट केली आहे.
रोहितने नेहमीच आपल्या कुटुंबाला खंबीर साथ दिली आहे आणि यावेळीही त्याचा ‘फॅमिली मॅन’ अंदाज पाहायला मिळाला.
अहानचं हे क्युट दर्शन क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंददायी क्षण ठरलं आहे.