गुलाब केवळ सौंदर्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही 'खास'; जाणून घ्या हे १० फायदे!

सकाळ डिजिटल टीम

सौंदर्याचे प्रतीक

गुलाब हे केवळ प्रेमाचे किंवा सौंदर्याचे प्रतीक नसून आयुर्वेदात याला महत्त्वाचे स्ठान आहे. गुलाबाचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत जाणून घ्या.

Rose Flower Benefits

|

sakal 

नैसर्गिक थंडावा

गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला 'गुलकंद' शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहे. उन्हाळ्यात किंवा पित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तींसाठी हे एक उत्तम औषध मानले जाते.

Rose Flower Benefits

|

sakal

त्वचेचे आरोग्य

गुलाबाचे पाणी (Rose Water) एक नैसर्गिक टोनर आहे. हे त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवते, चेहऱ्यावरील मुरुमे कमी करते आणि त्वचेला नैसर्गिक चमक देते.

Rose Flower Benefits

|

sakal 

तणाव आणि चिंतामुक्ती

गुलाबाचा सुगंध मनाला शांत करतो. गुलाबाच्या तेलाचा किंवा अर्काचा वापर केल्याने तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते.

Rose Flower Benefits

|

sakal 

विषारी घटक

गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये चयापचय शक्ती (Metabolism) वाढवणारे घटक असतात. गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा घेतल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि वजन कमी होण्यास मदत होते.

Rose Flower Benefits

|

sakal 

पचनसंस्था सुधारते

गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये फायबर असते जे नैसर्गिक रेचक (Laxative) म्हणून काम करते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि भूक वाढण्यास मदत होते.

Rose Flower Benefits

|

sakal 

डोळ्यांसाठी फायदेशीर

डोळ्यांची जळजळ होत असल्यास किंवा डोळे थकलेले असल्यास शुद्ध गुलाबाच्या पाण्याचे थेंब टाकल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो आणि खाज कमी होते.

Rose Flower Benefits

|

sakal 

तोंडाचे आरोग्य

तोंड आले असल्यास किंवा हिरड्यांमधून रक्त येत असल्यास गुलाबाच्या पाकळ्या चावून खाणे किंवा गुलाबाच्या पाण्याने गुळण्या करणे फायदेशीर ठरू शकते.

Rose Flower Benefits

|

sakal 

स्त्री आरोग्यासाठी

मासिक पाळीच्या दरम्यान होणारा अतिरक्तस्त्राव किंवा पोटदुखीवर गुलाबाच्या पाकळ्यांचे सेवन केल्याने आराम मिळतो, कारण यात दाहशामक गुणधर्म असतात.

Rose Flower Benefits

|

sakal 

तंदुरुस्ती, त्वचा आणि मनाचा फ्रेशनेससाठी केसराचे ७ भन्नाट फायदे

Saffron Health Benefits

|

sakal

येथे क्लिक करा