Aarti Badade
ही सवय दिसायला सामान्य असली तरी डोळ्यांसाठी घातक ठरू शकते.
धूळ, खाज, थकवा किंवा झोपेमुळे बहुतेक लोक डोळे चोळतात.
डोळे वारंवार चोळल्याने कॉर्नियावर दबाव येतो.
जर कॉर्निया आधीच पातळ किंवा सुजलेला असेल तर चोळल्याने समस्या वाढू शकते.
कॉर्नियाचा आकार बदलल्यास दिसणे अस्पष्ट होते आणि दृष्टी कमी होऊ शकते.
डोळे चोळल्याने डोळ्यांभोवतीच्या त्वचेला इजा होते व सूज वाढते.
लेन्स निघू शकतो आणि डोळ्याला जखम होऊ शकते.
डोळ्यांना खाज आल्यास थंड पाण्याने धुवा किंवा डोळ्यांचा ड्रॉप वापरा. चोळणे टाळा.