सकाळ डिजिटल टीम
गोविंदा फक्त अभिनय आणि नृत्यासाठीच नाही, तर त्याच्या स्टाईलसाठीही ओळखला जातो. ९० च्या दशकात त्याने आपल्या हटके अभिनयाने आणि भन्नाट डान्सने चाहत्यांची मने जिंकली.
सध्या गोविंदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यातील दुराव्याची चर्चा सुरू आहे.
१९८७ साली विवाहबंधनात अडकलेले गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्यात दुरावा निर्माण झाला असल्याचे सांगितले जात आहे. चर्चेनुसार, ते लवकरच वेगळे होऊ शकतात.
गोविंदा आणि सुनीता यांच्यातील दुराव्याची चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. गोविंदाचे एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याची अफवा पसरली आहे.
काही मुलाखतींमध्ये सुनीता आहुजा यांनी सूचक विधानं केली आहेत, ज्यामुळे त्यांच्या संसारातील तणावाबद्दल चर्चेला उधाण आलं आहे.
एका मुलाखतीत सुनीता यांनी सांगितले की, त्या आणि गोविंदा वेगळ्या ठिकाणी राहतात. त्यांचे वेळापत्रक जुळत नसल्यामुळे वेगळं राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.
गोविंदा आणि सुनीता यांच्या संसारात खरोखरच तणाव आहे की ही फक्त अफवा आहे, याचा तपशील लवकरच समजेल.