बाळकृष्ण मधाळे
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत फिट राहण्यासाठी अनेक जण धावण्याचा पर्याय निवडतात. मात्र, वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर धावण्यास सुरुवात करणे योग्य ठरेल का, असा प्रश्न अनेकांना पडतो.
Running After 40
esakal
तज्ज्ञांच्या मते, योग्य नियोजन आणि काळजी घेतल्यास चाळीशीनंतरही धावणे पूर्णपणे शक्य असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.
Running After 40
esakal
वय वाढत असताना शरीराची पुनर्प्राप्ती क्षमता (Recovery) काही प्रमाणात कमी होत जाते. त्यामुळे धावण्याची सुरुवात करताना घाई न करता नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाणे आवश्यक असते.
Running After 40
esakal
जगभरातील अनेक धावपटूंनी ४०, ५० आणि अगदी ६० वर्षांनंतरही अर्ध-मॅरेथॉन तसेच पूर्ण मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
Running After 40
esakal
चाळीशीनंतर धावण्यास सुरुवात करण्यासाठी योग्य प्रशिक्षण, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि सातत्यपूर्ण सराव या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. याशिवाय, शरीराची क्षमता ओळखून त्यानुसार व्यायामाचे नियोजन करणे गरजेचे आहे.
Running After 40
esakal
हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता किंवा गुडघे व कंबरेच्या सांध्यांशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी धावण्यास सुरुवात करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वैद्यकीय तपासणी करून शरीराची सद्यस्थिती जाणून घेणे अधिक सुरक्षित ठरते.
Running After 40
esakal
जर अनेक वर्षे निष्क्रिय जीवनशैली असेल, तर थेट धावण्यास सुरुवात करणे टाळावे. सुरुवातीला नियमित चालणे, त्यानंतर वेगाने चालणे आणि मग हळूहळू धावण्याकडे वाटचाल करणे हा अधिक योग्य मार्ग आहे. पहिल्याच दिवशी ५ किंवा १० किलोमीटर धावण्याचा प्रयत्न करू नये.
Running After 40
esakal
धावताना चांगल्या दर्जाचे आणि पायाला योग्य बसणारे रनिंग शूज वापरणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य शूजमुळे गुडघे, टाच आणि पाठीवर येणारा ताण कमी होण्यास मदत होते.
Running After 40
esakal
तज्ज्ञांच्या मते, वय वाढल्यानंतर शरीराला विश्रांती आणि पुनर्प्राप्तीसाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे सरावासोबत पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. धावताना किंवा धावल्यानंतर गुडघे, टाच, कंबर किंवा छातीत वेदना जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Running After 40
esakal
What is Anemia and Blood Deficiency?
esakal