Apurva Kulkarni
अनुपमा म्हणजेच रुपाली गांगुली ही नेहमीच चर्चेत असते. अशातच आता ती वेगळ्या कारणाने चर्चेत आलीय.
सर्वोच्च न्यायालनाने भटक्या कुत्र्यांसंदर्भात दिलेल्या निर्णयावर रुपाली गांगुलीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय.
रुपाली यांनी पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल करायला सुरुवात केलीय.
तसंच तिच्यावर बीफ, मासे, मटण, चिकन खाण्याचेही आरोप करण्यात आले आहेत.
एका नेटकऱ्यांनी लिहलं की, 'तुम्ही जर बीफ खात असाल तर भटक्या कुत्र्यांबाबत तुम्ही बोलूच शकत नाही.'
तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहलं की, 'प्राण्यावरील प्रेम सर्व प्राण्याला लागू होतं. एवढंच असेल तर 10 भटक्या कुत्र्यांना दत्तक घ्या'
दरम्यान तिच्या पोस्टनंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. तसंच तिच्यावर गोमांस खात असल्याचा आरोपही करण्यात आला.