ट्रोल करणाऱ्यांना रुपाली गांगुलीचं रोखठोक उत्तर

Anuradha Vipat

या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे

अभिनेत्री रुपाली गांगुली 'अनुपमा' या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे आता घराघरात ‘अनुपमा’ या नावानेच ओळखली जाते

व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी एअरपोर्टवरील रुपालीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

पायांना स्पर्श

यामध्ये ती तिच्या पतीच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेताना दिसतेय. या व्हिडीओवरून अनेकांनी रुपालीला ट्रोल केलं होतं.

ट्रोलर्सना उत्तर

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रुपालीने या ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.

काम करण्यासाठी प्रोत्साहन

मुलाखतीत रुपाली म्हणाली, “माझे पती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांनी मला नेहमी इंडस्ट्रीत काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

यात काहीच कमीपणा

पुढे रुपाली म्हणाली, माझ्या मते ते आमच्या घराचे ‘मुखिया’ आहेत म्हणूनच मी नेहमी त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेते. यात काहीच कमीपणा वाटून घेण्यासारखं नाही.

अखेर मिटलं इमरान हाश्मी-मल्लिका शेरावतचं भांडण