Putin Walking Style : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा एकही हात चालताना का हलत नाही? काय आहे यामागचं कारण?

सकाळ डिजिटल टीम

पुतिन यांच्या चालण्यामागचं रहस्य काय?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या चालण्याची शैली जगभरात अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

Putin Walking Style

|

esakal

तुम्ही कधी लक्ष दिलंय का?

तुम्ही कधी लक्ष दिलंय का? पुतिन चालताना त्यांचा डावा हात नैसर्गिकरीत्या पुढे-मागे करतात; पण उजवा हात मात्र जवळपास स्थिरच राहतो.

Putin Walking Style

|

esakal

चालण्यामागं दडलंय विशेष प्रशिक्षण

बहुतांश लोकांना हा प्रश्न पडतो, की हा कोणता शारीरिक त्रास आहे का? पण, प्रत्यक्षात अशा काहीही वैद्यकीय समस्या नाहीत. या चालण्यामागं दडलेलं आहे एक विशेष प्रशिक्षणाचं रहस्य.

Putin Walking Style

|

esakal

केजीबी प्रशिक्षणाचा परिणाम

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुतिन यांच्या अजब वाटणाऱ्या चालण्याचा संबंध त्यांच्या भूतकाळातील केजीबी (KGB) प्रशिक्षणाशी आहे. पुतिन यांनी रशियाच्या या गुप्तचर संस्थेत काम केले असून तेथील एजंटना एक खास प्रकारचे प्रशिक्षण दिले जात असे.

Putin Walking Style

|

esakal

KGB प्रशिक्षणानुसार :

  • एजंटने उजवा हात नेहमी शस्त्राजवळ तयार ठेवायचा

  • चालताना डावा हात नैसर्गिकरीत्या हालू द्यायचा

  • हल्ला किंवा धोका आल्यास उजव्या हाताने त्वरित शस्त्र पकडता यावे, हा त्यामागचा उद्देश

Putin Walking Style

|

esakal

उजवा हात फारसा हलताना दिसत नाही!

यामुळे केजीबी एजंटची चालण्याची शैली इतर सामान्य माणसांपेक्षा वेगळी दिसते. पुतिन यांनीही आयुष्यभर या सवयीचे पालन केले असून आजही त्यांचा उजवा हात फारसा हलताना दिसत नाही.

Putin Walking Style

|

esakal

ही शारीरिक समस्या नाही

तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की पुतिन यांच्या चालण्याच्या पद्धतीत कोणतीही शारीरिक बिघाड किंवा न्यूरोलॉजिकल समस्या नाही. हे फक्त त्यांच्या गुप्तचर प्रशिक्षणातून आलेले कौशल्य आहे, जे त्यांच्या शरीरात नकळतपणे रुजले आहे.

Putin Walking Style

|

esakal

Kovidar Tree : अयोध्येच्या धर्मध्वजावरचा 'कोविदार' नक्की कोणता वृक्ष? रामायणात काय आहे उल्लेख?

Importance of Kovidar Tree

|

esakal

येथे क्लिक करा...