Shubham Banubakode
विदेशातील हजारो पर्यटक दरवर्षी भारतात येतात.
हे पर्यटक भारतीयांसाठी आकर्षणाचा विषय असतात.
अशावेळी अनेकांना विदेशी पर्यटकांसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही
विदेशी पर्यटकही आनंदाने त्यांच्यासोबत सेल्फी घेतात.
मात्र, एका विदेशी महिलेने सेल्फी घेण्याच्या विनंतीला कंटाळून अजब जुगाड शोधलाय.
ही महिला रशियन नागरिक असल्याची माहिती आहे.
तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
ती गोव्यातील समुद्रकिनारी पर्यटनासाठी आली आहे.
भारतीय पर्यटक तिच्यासोबत वारंवार सेल्फी घेण्याची विनंती करत आहेत.
अखेर या रशियन महिलेने कंटाळून सेल्फी घेण्यासाठी १०० रुपये आकारण्यास सुरुवात केली.
काही भारतीय पर्यटक सेल्फी घेण्यासाठी तिला १०० रुपयेही दिले.
अंजेलिना असं या रशियन महिलेचं नाव आहे.
तिने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.