Pranali Kodre
आयपीएल २०२६ स्पर्धेत २६ एप्रिलला झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला गुजरात टायटन्सविरुद्ध ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.
CSK vs GT
Sakal
मात्र या सामन्यात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने कठीण परिस्थितीतून संघाला सावरताना ६० चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली.
Ruturaj Gaikwad
Sakal
या खेळीदरम्यान त्याने एका मोठ्या वैयक्तिक विक्रमाला गवसणी घातली आहे.
Ruturaj Gaikwad
Sakal
ऋतुराजने या खेळीदरम्यान चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना आयपीएलमध्ये १०० षटकार पूर्ण केले. असा पराक्रम करणारा तो केवळ चौथा खेळाडू ठरला.
Ruturaj Gaikwad
Sakal
चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार एमएस धोनीने मारले असून त्याने २४८ सामन्यांत २३४ षटकार मारले आहेत.
MS Dhoni
Sakal
त्यानंतर सुरेश रैना दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएलमध्ये १७६ सामन्यांत १८० षटकार मारले आहेत.
Suresh Raina
Sakal
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर शिवम दुबे असून त्याने ६३ सामने चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएलमध्ये खेळताना १०६ षटकार मारले आहेत.
Shivam Dube
Sakal
आता या यादीत चौथ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाड असून त्याने ७९ सामने चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना १०१ षटकार मारलेत.
(आकडेवारी २६ एप्रिल २०२६ पर्यंत)
Ruturaj Gaikwad
Sakal
Virat Kohli
Sakal