Apurva Kulkarni
सब्जामध्ये लोह आणि फॅटी अॅसिडचं प्रमाण असतं. त्यामुळे केसांना दोन तोंड फुटण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळतं.
केस मजबूत करुन केस गळती रोखण्यासाठी मदत होते. त्यामुळे सब्जा केस धुताना एकदा नक्की वापरा.
सब्जा उन्हात वाळवून खोबऱ्याच्या तेलात त्याची पावडर मिसळून लावल्यास डोक्यातील कोंडा कमी होण्यास मदत होते.
खोबऱ्याच्या तेलात सब्जाची पावडर आणि जास्वंदेची फुल मिक्स करुन पेस्ट केसांना लावल्यास केस मुलायम आणि चमकदार होतात.
डोकेदुखी, तणाव दूर करण्यासठी सब्जा बीचा उपयोग केला जातो.
पाण्यात भिजवलेला सब्जा, लिंबाचा रस आणि तेलाचे काही थेंब टाकून केसांच्या मुळाशी मसाज केल्यास तणाव दूर होतो.
त्यामुळे केसांना एकदा सब्जा लावून बघा. तुम्हा केसांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.