घरच्या घरी बनवा महाशिवरात्रीला कुरकुरीत साबुदाणा वडे

सकाळ वृत्तसेवा

साबुदाणा वडा काय आहे?

साबुदाणा वडा ही लोकप्रिय महाराष्ट्रीयन उपवासाची रेसिपी आहे. भिजवलेला साबुदाणा, बटाटा व शेंगदाण्याच्या कुटापासून हे वडे बनतात.

Crispy Sabudana Vada

|

esakal

लागणारे साहित्य

भिजवलेला साबुदाणा – 1 कप उकडलेला बटाटा – 1 ते 2

शेंगदाण्याचा कूट – ½ कपहिरवी मिरची – चवीनुसार जिरे – ½ चमचा कोथिंबीर – 2-3 चमचे सैंधव मीठ – चवीनुसार तेल – तळण्यासाठी

Crispy Sabudana Vada

|

esakal

तयारी

साबुदाणा 4-5 तास भिजवून घ्या. बटाटे उकडून सोलून चांगले मॅश करा. शेंगदाणे भाजून कूट करून ठेवा.

Crispy Sabudana Vada

|

esakal

मिश्रण

एका भांड्यात साबुदाणा, बटाटा, शेंगदाण्याचा कूट, मिरची, जिरे, कोथिंबीर व मीठ घालून मळा. मिश्रण घट्ट असावे.

Crispy Sabudana Vada

|

esakal

वडे वळणे

मिश्रणाचे गोळे करा. तळहातावर दाबून चपटे वडे तयार करा. कडा तुटणार नाहीत याची काळजी घ्या.

Crispy Sabudana Vada

|

esakal

तळण्याची पद्धत

तेल मध्यम गरम करा. वडे सोडून दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळा. आच मध्यम ठेवा.

Crispy Sabudana Vada

|

esakal

ॲसिडिटी की अल्सर? ‘ही’ धोकादायक लक्षणे वेळीच ओळखा!

Signs of Stomach Ulcer

|

esakal

येथे क्लिक करा