ॲसिडिटी की अल्सर? ‘ही’ धोकादायक लक्षणे वेळीच ओळखा!

Aarti Badade

पोटाचा अल्सर म्हणजे काय?

अल्सर म्हणजे पोट किंवा लहान आतड्याच्या आतील अस्तरावर पडलेले जखम किंवा व्रण. जेव्हा पोटातील ॲसिड आणि संरक्षणात्मक आवरण यातील संतुलन बिघडते, तेव्हा हा त्रास होतो.

Signs of Stomach Ulcer

|

Sakal

तीव्र जळजळ

पोटात सतत जळजळ होणे किंवा खाल्ल्यानंतर पोटाच्या वरच्या भागात तीव्र वेदना होणे, हे अल्सरचे सर्वात प्राथमिक आणि महत्त्वाचे लक्षण आहे.

Signs of Stomach Ulcer

|

Sakal

मळमळ

अल्सरमुळे वारंवार मळमळणे, उलट्या होणे किंवा भूक मंदावणे यांसारखे त्रास जाणवू लागतात. यामुळे रुग्णाचे वजनही वेगाने घटू शकते.

Signs of Stomach Ulcer

|

Sakal

अल्सरची मुख्य कारणे

'एच. पायलोरी' (H. pylori) बॅक्टेरियाचा संसर्ग, जास्त तिखट-तेलकट खाणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेल्या पेनकिलर गोळ्यांमुळे अल्सरचा धोका वाढतो.

Signs of Stomach Ulcer

|

Sakal

बिघडलेली जीवनशैली

अति प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, मानसिक ताण आणि अनियमित जेवणाच्या वेळा यामुळे पोटातील ॲसिड वाढून अल्सरच्या जखमा अधिक खोल होतात.

Signs of Stomach Ulcer

|

Sakal

काय टाळावे?

अल्सरचा त्रास असल्यास जास्त मसालेदार पदार्थ, अतिरिक्त कॅफिन (चहा-कॉफी) आणि प्रोसेस्ड फूड खाणे पूर्णपणे बंद करावे.

Signs of Stomach Ulcer

|

Sakal

काय खावे?

पचन सुलभ होण्यासाठी आहारात दूध, दही, ताक, पालेभाज्या आणि फायबरयुक्त फळांचा समावेश करा. यामुळे पोटाला थंडावा मिळतो आणि जखमा भरण्यास मदत होते.

Signs of Stomach Ulcer

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला

जर तुम्हाला वारंवार ॲसिड रिफ्लक्स किंवा गॅसचा त्रास होत असेल, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

Signs of Stomach Ulcer

|

Sakal

डायबिटीज असलेले उपवास करू शकतात का? शुगर लेव्हलबद्दल जाणून घ्या

Low blood sugar symptoms Diabetes and Fasting

|

Sakal

येथे क्लिक करा