kimaya narayan
मराठी इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. भारतीय सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.
सचिन पिळगावकर यांची सुरुवातीच्या काळात बालकलाकार म्हणून होती. त्यानंतर एक उत्तम तरुण अभिनेता म्हणून बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीत नाव कमावलं. तर त्यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमेही खूप गाजली.
सुरुवात
बालकलाकार म्हणून सचिन यांनी सिनेइंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली. त्यांना पहिलं काम त्यांच्या एका फोटोशूटमुळेच मिळालं. विशेष म्हणजे हे फोटोशूट त्यांनी स्वतःच दिग्दर्शित केलं होतं.
सचिन यांनी ही आठवण त्यांचं आत्मचरित्र असलेल्या हा माझा मार्ग एकला मध्ये शेअर केली आहे.
सचिन लहान असताना त्यांच्या वडिलांनी मित्राच्या सांगण्यावरून सचिन यांचं फोटोशूट केलं. एका फोटोग्राफरला त्यासाठी घरी बोलावण्यात आलं होतं.
फोटोग्राफरने पोझ सांगितल्यावर सचिन यांनी त्याला थांबवलं आणि असे फोटो चांगले येणार नाहीत असं म्हटलं आणि त्यांनी फ्लॅश न मारता दरवाजा उघडून त्या प्रकाशात फोटो काढायला सांगितले.
सचिन यांची हुशारी पाहून त्यांचे वडील हसले आणि मुलाच्या हुशारीवर खुश झाले.
सचिन यांनी हाच माझा मार्ग एकला या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण केलं. या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.