Payal Naik
लोकप्रिय मराठी अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा २ ची प्रेक्षक वाट आहेत.
हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
मात्र त्यापूर्वी या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.
'डम डम डम डम डमरू वाजे' असं या गाण्याचं नाव असून त्यावर कलाकार नृत्य करताना दिसतायत.
गाण्यावर सचिन आणि स्वप्नील जोशी नाचताना दिसतायत. तर त्यांच्यासोबत सुप्रिया आणि हेमल इंगळेदेखील आहेत.
या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
चित्रपटात सचिन आणि स्वप्नील यांची बापलेकाची जोडी दाखवण्यात आली आहे.
हा चित्रपट गणेशोत्सवानंतर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक चित्रपट पाहण्यास उत्सुक आहेत.