Pranali Kodre
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने २४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवताना अनेक विक्रम केले आहेत. त्यातीलच खास १० विक्रमांवर नजर टाकू जे तोडणं आजही कठीण आहे.
सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत १०० आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत. त्याचा हा विक्रम दशकापासून अबाधित आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणाऱ्यांमध्ये त्याच्या मागे असणाऱ्या विराटची ८१ शतके आहेत.
सचिनने त्याच्या १०० शतकांपैकी ५१ शतके ही कसोटीत केली आहेत. त्याच्या मागे असलेल्या सक्रिय खेळाडूंमध्ये स्टीव्ह स्मिथ आणि जो रुट यांची ३६ शतके आहेत. त्यामुळे त्यांना सचिनपर्यंत पोहण्यासाठी अजूनही १५ शतकांची गरज आहे.
सचिनने त्याच्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत २०० कसोटी सामने खेळले आहेत. आजपर्यंत त्याच्याशिवाय असा विक्रम कोणालाही करता आलेला नाही.
सचिनने सर्वाधिक वनडे सामनेही खेळले आहेत. त्याने ४६३ वनडे खेळले आहेत.
सचिनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक ३४३५७ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर वनडे आणि कसोटीतही सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने कसोटीत १५९२१ धावा आणि वनडेत १८४२६ धावा केल्या आहेत.
सचिन तेंडुलकरची वनडे कारकिर्द २२ वर्षे ९१ दिवसाची होती. त्यामुळे सर्वाधिक काळ वनडे कारकिर्द असण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
सचिन तेंडुलकरने १९९८ साली वनडेत १८९४ धावा ठोकल्या होत्या. एकाच वर्षात एका फलंदाजाने काढलेल्या या सर्वाधिक धावा असून आजही सचिनचा हा विक्रम अबाधित आहे.