Shubham Banubakode
सारा तेंडुलकर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची मुलगी असून ती फॅशन आणि सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवते आहे.
ती बांद्रा येथील तिच्या आलिशान डोराब व्हिलामध्ये राहते. हा व्हिला सचिनने २००७ मध्ये ३९ कोटींत खरेदी केला होता. ज्याची किंमत आता १०० कोटी आहे.
साराने धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले आहे. तसेच तिने कॉलेज लंडनमधून मेडिसिनची पदवी प्राप्त केली.
२०२१ मध्ये साराने तिच्या फॅशन करिअरची सुरुवात केली. तिने पॅरिस, मिलान आणि न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक करत आपली छाप पाडली.
सारा सोशल मीडियावरही सक्रीय असून तिचे इंस्टावर २५ लाख फॉलोअर्स आहेत. तिला फिरण्याचीही आवड आहे. ती प्रवासाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते.
सारा फक्त हौस म्हणून फिरत नाही, तर अनेकदा सामाजिक कार्यासाठीही प्रवास करते.
२०२३ पर्यंत साराची अंदाजे संपत्ती ५० लाख ते १ कोटी रुपये इतकी आहे. ती मॉडेलिंग, ब्रँड एंडोर्समेंट्समधून पैसे कमावते.