Shubham Banubakode
विराट कोहलीची अप्रैल २०२५ पर्यंतची एकूण संपत्ती १२५ दशलक्ष डॉलर म्हणजेच १,०५० कोटी इतकी आहे.
सचिन तेंडुलकर (१७० दशलक्ष डॉलर) नंतर तो जगातील दुसरा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे.
बीसीसीआयचा ए+ ग्रेड करार मिळाल्याने विराटला बीसीसीआयकडून वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात. हा त्याच्या स्थिर उत्पन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
कोहलीला एका कसोटी सामन्यासाठी १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख, तर टी-२० साठी ३ लाख रुपये मिळतात.
विराट आयपीएलमध्ये आरसीबी संघाचा भाग आहे. आयपीएल फ्रँचायझीद्वारे मिळणारी फी उत्पन्नाचा मोठा भाग आहे. ही रक्कम कोट्यवधीत आहे.
याशिवाय कोहलीला जाहिरातीतूनही कोट्यवधीचं उत्पन्न मिळतं. अनेक मोठ्या ब्रँड्ससोबत त्याचे करार आहेत.
याशिवाय विराटची व्यावसायिक गुंतवणूकही आहे.ज्यात जीम आणि रेस्टॉरंट्स यांचा समावेश आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, विराट कोहलीची वार्षिक कमाई २७० कोटींपेक्षा जास्त आहे.
कोहलीने भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक यश मिळवले आहेत.