Pranali Kodre
२७ फेब्रुवारी रोजी देशभरात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. त्यातही महाराष्ट्रात हा दिवस मोठ्या अभिमानाने आणि उत्सुहाने साजरा केला जातो.
आपल्या मायबोलीबद्दल महाराष्ट्रातून या दिवशी आदर आणि सन्मान व्यक्त केला जातो.
त्यामुळे मराठी भाषा गौरव दिनाच्या अनेकजण शुभेच्छा देतात.
भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही मराठी भाषा गौरव दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिन महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरातील रहिवासी आहे.
त्याने शुभेच्छा देताना लिहिले आहे की 'मराठी माझ्या रक्तात आहे, मराठी माझ्या श्वासात आहे. सर्व मराठी बंधु-भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!'
सचिन व्यतिरिक्त मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने देखील सकाळीच दिल्या आहेत.
रहाणेने लिहिले, 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.'