Aarti Badade
गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर ओटीपोट व योनिमार्गातील स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे ते कमकुवत होतात.
सिझेरियन झालेल्या महिलांमध्ये पोटाचे स्नायू अजून अधिक कमकुवत होतात, त्यामुळे त्यांना विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
कमकुवत स्नायूंमुळे कंबरदुखी, थकवा व हालचालींमध्ये अडथळा जाणवू शकतो.
स्नायू बळकट नसल्यास बाळाला उचलणे, खेळवणे यासारख्या क्रिया शरीराला झेपेनाशा होतात.
ओटीपोट आणि योनी भागातील स्नायू मजबूत करणारे विशिष्ट व्यायाम प्रकार करणे आवश्यक आहे.
यामुळे स्नायू बळकट होतात, कंबरदुखी कमी होते, उर्जा वाढते आणि मानसिक ताणही कमी होतो.
केगेल एक्सरसाइज, पेल्विक टिल्ट, डीप ब्रीदिंग विद अब्डॉमिनल कंट्रॅक्शन हे उपयुक्त आहेत. (तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावेत.)
सामान्य प्रसूतीनंतर ४-६ आठवड्यांनी, तर सिझेरियननंतर ८-१० आठवड्यांनी – डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुरू करावेत.
सॉफ्ट मॅटवर, दररोज १०-१५ मिनिटे हे व्यायाम करता येतात. नियमितता सर्वाधिक महत्त्वाची आहे.