हिवाळ्यात दाट धुक्यातून कार चालवताना 'या' १० चुका कधीच करु नका

Yashwant Kshirsagar

कारच्या लाइट्स तपासा

प्रवासाला निघण्यापूर्वी कारचे हेडलाइट, टेललाइट, इंडिकेटर आणि फॉग लँप व्यवस्थित सुरू आहेत का, हे तपासा. गरजेनुसार फॉग लँपचा वापर करा.

Safe Driving in Fog

|

esakal

हेडलाइट नेहमी लो बीमवर ठेवा

धुक्यात हाय बीमचा प्रकाश पाण्याच्या सूक्ष्म थेंबांवर परावर्तित होतो. त्यामुळे समोरचा रस्ता पाहणं कठीण होतं. म्हणून धुक्यात लो बीम हेडलाइटचा वापर करा.

Safe Driving in Fog

|

esakal

कारच्या काचा स्वच्छ ठेवा

समोरच्या आणि मागच्या काचा तसेच साइड मिरर स्वच्छ करा. काचेवर धुकं जमा झाल्यास डिफॉगर किंवा डिफ्रॉस्टचा वापर करा.

Safe Driving in Fog

|

esakal

वायपरची स्थिती तपासा

खराब वायपरमुळे काचेवरील ओलावा आणि धूळ व्यवस्थित साफ होत नाही. त्यामुळे प्रवासापूर्वी वायपरची तपासणी करा आणि गरज असल्यास ते बदला.

Safe Driving in Fog

|

esakal

टायर आणि ब्रेकची तपासणी करा

धुक्यात अचानक ब्रेक लावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे टायरमधील हवेचा दाब, टायरची झीज आणि ब्रेकची स्थिती तपासा. ब्रेकमधून आवाज येत असल्यास आधी दुरुस्ती करा.

Safe Driving in Fog

|

esakal

गाडीचा वेग कमी ठेवा

दाट धुक्यात वेगाने कार चालवणं धोकादायक ठरू शकतं. समोर जितका रस्ता स्पष्ट दिसतोय, त्यानुसार वेग नियंत्रित ठेवा. अचानक ब्रेक लावण्याची वेळ येणार नाही, याची काळजी घ्या.

Safe Driving in Fog

|

esakal

पुढील वाहनापासून अंतर

धुक्यात पुढील वाहन अचानक थांबल्यास अपघात होऊ शकतो. त्यामुळे सामान्य दिवसांच्या तुलनेत पुढील वाहनापासून अधिक अंतर ठेवा. यामुळे सुरक्षितपणे ब्रेक लावण्यासाठी वेळ मिळतो.

Safe Driving in Fog

|

esakal

ओव्हरटेक आणि लेन बदलणं टाळा

धुक्यात समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येणं कठीण असतं. त्यामुळे घाईत ओव्हरटेक करू नका. आपल्या लेनमध्येच वाहन चालवा आणि रस्त्यावरील मार्किंगचा आधार घ्या.

Safe Driving in Fog

|

esakal

हॅजर्ड लाइट

धुक्यात दोन्ही इंडिकेटर सतत सुरू ठेवणं टाळा. त्यामुळे मागील वाहनचालकांना वळण्याचा किंवा लेन बदलण्याचा चुकीचा संकेत मिळू शकतो. हॅजर्ड लाइटचा वापर आपत्कालीन परिस्थितीत किंवा वाहन सुरक्षित ठिकाणी थांबवल्यावर करा.

Safe Driving in Fog

|

esakal

दाट धुक्यात प्रवास टाळा

समोरचं काहीच दिसत नसेल तर प्रवास सुरू करण्याऐवजी धुकं कमी होण्याची वाट पाहा. प्रवासादरम्यान अचानक धुकं वाढल्यास महामार्गावर मध्येच गाडी थांबवू नका. सुरक्षित पार्किंग किंवा सर्व्हिस एरियामध्ये जाऊनच वाहन थांबवा.

Safe Driving in Fog

|

esakal

विमानाच्या सीटवर त्रिकोणी खूण का असते? अनेकांना खरं कारण माहीतच नाही

Triangle Above Airplane Seat

|

esakal

येथे क्लिक करा