Who is Sai Jadhav : सई जाधव कोण आहे? ९३ वर्षांचा विक्रम मोडत घडवलाय इतिहास!

Mayur Ratnaparkhe

महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास! -


कोल्हापूरची सई जाधव बनली भारतीय सैन्य अकादमीमधून पास होणारी पहिली महिला अधिकारी

93 वर्षांचा इतिहास मोडीत -


IMA स्थापनेपासून आतापर्यंत 67,000 पेक्षा अधिक अधिकारी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले, मात्र सई जाधव ही पहिली महिला अधिकारी ठरली आहे.

सैनिकी परंपरेचा वारसा
सई जाधवचे परदादा ब्रिटिश आर्मीत, आजोबा भारतीय सैन्यात अधिकारी, तर वडील संदीप जाधव सध्या भारतीय सैन्यात कार्यरत आहेत.

चौथी पिढी सैन्यात दाखल
जाधव कुटुंबाची चौथी पिढी भारतीय सैन्यात दाखल होत असून सई आता टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट म्हणून सेवा देणार आहे.

आई-वडिलांच्या हातून ‘स्टार्स’-


प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सई जाधवच्या आई-वडिलांनी तिच्या खांद्यावर स्टार्स लावले आणि हा क्षण इतिहासात नोंदला गेला.

महिलांसाठी समान संधींची सुरुवात
सई जाधवचे यश केवळ विक्रम नाही, तर भारतीय सैन्यात महिलांसाठी समान संधींचा नवा अध्याय आहे.

वय अवघे 23 वर्षे
कोल्हापूर जिल्ह्यात जन्मलेल्या सई जाधवने बेलगाव येथून 12 वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिचं मूळ गाव जयसिंगपूर आहे.

Next : मॅनेजमेंट स्टडीजसाठी जगातील टॉप १० संस्था कोणत्या?

MBA |

esakal

येथे पाहा