Pranali Kodre
आयपीएल २०२५ मध्ये ७०० धावांचा टप्पा सर्वात आधी गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनने केल्या आहेत.
त्याने आयपीएल २०२५ हंगामात १५ सामन्यात ७५९ धावा केल्या आहेत. त्यामुळे तो आयपीएल हंगामात ७०० धावा करणारा ९ वा फलंदाज ठरला आहे.
ख्रिस गेल याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खेळताना २०१२ आयपीएलमध्ये ७३३ धावा आणि २०१३ आयपीएलमध्ये ७०८ धावा केल्या होत्या.
माईक हसीने चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना २०१३ आयपीएलमध्ये ७३३ धावा केल्या होत्या.
विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खेळताना २०१६ साली आयपीएलमध्ये तब्बल ९७३ धावा ठोकल्या होत्या. तसेच त्याने २०२४ मध्येही ७४१ धावा केल्या होत्या.
डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना २०१६ साली आयपीएलमध्ये ८४८ धावा केल्या होत्या.
केन विलियम्सनने सनरायझर्स हैदसाबादसाठी खेळताना २०१८ साली आयपीएलमध्ये ७३५ धावा केल्या होत्या.
जॉस बटलरने २०२२ आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी ८६३ धावा केल्या होत्या.
शुभमन गिलने २०२३ आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी खेळताना ८९० धावा केल्या होत्या.
फाफ डू प्लेसिसने २०२३ आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी ७३० धावा केल्या होत्या.