Swadesh Ghanekar
साई सुदर्शनने राजस्थान रॉय्सविरुद्धच्या सामन्यात ८ चौकार व ३ षटकारासह ८२ धावांची खेळी केली.
साईच्या फटकेबाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने २० षटकांत २१७ धावांपर्यंत मजल मारली.
राजस्थान रॉयल्सचा १५९ धावांवर ऑल आऊट झाला आणि गुजरातने ५८ धावांनी सामना जिंकला.
साई सुदर्शनने या सामन्यात मोठ्या विक्रमाला गवसणी घालताना ख्रिस गेल व केन विलियम्सन यांना मागे टाकले.
आयपीएलमध्ये पहिल्या ३० डावांत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये साई जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला
साई सुदर्शनने ३० इनिंग्जनंतर IPLमध्ये १३०७ धावा केल्या, ज्या भारतीयांमध्ये सर्वाधिक आहेत.
ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श १३२८ धावांसह या विक्रमात अव्वल आहे. गेल ( १४१४) व केन ( १०९६) मागे आहेत.
भारतीयांमध्ये यापूर्वी ऋतुराज गायकवाड ९७७ धावांसह अव्वल होता, परंतु आता साई पुढे गेला आहे.
सचिन तेंडुलकरने आयपीएलच्या पहिल्या ३० डावांत ९७५ धावा केल्या होत्या.